Mumbai Latest Kidnapping News : गुजरात येथून मुंबई येथे आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण, 24 तासांत कांदिवली येथून आरोपींना अटक
मुंबई :- बच्छाव रेल्वे स्टेशन, जिल्हा कच्छ गुजरात येथुन कच्छ एक्स्प्रेसने मुंबई येत असताना अपहरण झालेल्या व्यापाराची पोलिसांनी सुखरूप सुटका करून 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. Mumbai Latest Kidnapping News “उद्या 25 लाख रूपये अंगडिया मार्फत दे नाहीतर वडीलांना चाकुने भोकसुन मारील” अशी खंडणीकरीता धमकी दिली होती. या संदर्भात महेशकुमार केशवजी चौधरी (वय 42 रा.शारदादेवी चाळ प्रभात कॉलनी, सांताक्रुज पुर्व) यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अतिशय संवेदनशील व ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण केलेले असल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मनीष कलवानिया पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-8, मुंबई,दौलत साळवे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकोला विभाग, मुंबई,प्रकाश खांडेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी-अंमलदार यांवी 4 पोलीस तपास पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली.
तपास पथकांनी तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करून तसेच गोपनीय माहीती काढुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. गुन्हयातील आरोपी त्यांचे लोकेशन वांरवार बदलत होते, त्यानंतर देखील त्यांचा पाठलाग करत असताना त्यांना 26 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास लालजी पाडा, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे जावुन गुन्हयातील खालील राधेश्याम मेवालाल सोनी (वय 30) आरोपी यास ताब्यात घेतले.आरोपीकडे केलेल्या तपासात त्याचे साथीदार हे गुन्हयात अपहरण केलेल्या व्यक्तीसोबत राममंदिर पश्चिम येथील एका इमारतीमध्ये ठेवल्याचे माहीती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून सतिश नंदलाल यादव (वय 33),धर्मेंद्र रामपती रविदास (वय 40) अटक केली असून पोलिसांनी केशवजी भीमाबाई चौधरी (वय 60) यांची सुखरूप सुटका केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…