क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Job Fraud : आग्रीपाडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई – बनावट लोन जाहिरातीतून गरजूंना फसवणारा ठग जाळ्यात!

Mumbai Latest Crime News : मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत ऑनलाईन लोन घोटाळ्याचा पर्दाफाश करून एक भुरटे मास्टरमाईंड शिताफीने पकडला आहे.

फसवणुकीची चलाखी

सातरस्ता सर्कल येथील मिनल मर्चडे यांनी वृत्तपत्रात दिलेल्या “लोन मिळेल” जाहिरातीतील मोबाईल नंबरवर संपर्क साधला.
सदर मोबाईल धारकाने स्वत:ला बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून बनावट ओळखपत्र, बनावट लोन मंजुरी पत्र व खोटे मेल आयडी वापरून
फिर्यादी व इतर गरजू नागरिकांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्या बँक खात्यातून ₹७०,००० ची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

पोलिसांचा गुप्त तपास

१७ सप्टेंबर २०२५ रोजी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली
तांत्रिक तपास, सायबर ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीचा आधार घेऊन
पोलिस पथकाने नवी मुंबईतील उलवे परिसरात २७ सप्टेंबर रोजी सापळा रचला.

छाप्यात मोठा मुद्देमाल

अटक आरोपी लक्ष्मण मारुती जोगळेकर यांच्या घरातून

  • २७ मोबाईल फोन
  • २५ डेबिट कार्ड
  • ५३ बँक खाते व पासबुक
  • राऊटर
  • ₹१३,४०० रोकड
    असा जबर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ‘सिरीयल फ्रॉडस्टर’चा काळा इतिहास

या ठगाविरुद्ध आधीपासूनच ८ गुन्हे नोंद आहेत:

तुर्भे (३), पनवेल (१), भोसरी पुणे (१), विमानतळ पुणे (१),
ठाणे नगर (१), माटुंगा मुंबई (१)

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

पोलिसांचा पराक्रम

ही कारवाई
पोलीस आयुक्त देवेन भारती,
सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी,
अपर पोलीस आयुक्त महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
आग्रीपाडा पोलिस ठाण्याच्या सायबर–गुन्हे पथकाने अत्यंत तांत्रिक कौशल्याने पूर्ण केली.

मोठमोठ्या बँकांची नावे वापरून लोकांच्या हताशपणावर डल्ला मारणाऱ्या या सायबर ठगाचा पर्दाफाश करून पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना ऑनलाईन व्यवहारात जागरूक राहण्याचा इशारा दिला आहे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0