Mumbai Illegal Sex racket Busted : भाईंदर परराज्यातील महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दलाल महिलेला अटक, तीन मुलींची सुटका
Mumbai Illegal Sex racket Busted : भाईंदरमध्ये काही तरुणींकडून सेक्स रॅकेट चालवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
भाईंदर :- परराज्यातून काही तरुणींकडून सेक्स रॅकेट Mumbai Illegal Sex racket चालवण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांच्या बातमीदाराकडून रेश्मा शेख हि वेशाव्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. Bhayandar Crime News
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सेक्स रॅकेटचा Bhayandar Illegal Sex Racket भांडाफोड करण्याकरिता पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक कडून सेक्सकरिता रेश्मा शेख हिच्याशी संपर्क साधून मुलींचे मागणी केली होती. रेश्मा यांनी बोगस गिऱ्हाईक यांना दारसा ढाबा, मुंबई अहमदाबाद महामार्ग, काशिगांव, काशिमीरा येथे बोलविले असता छापा टाकून महिला वेश्यादलाल रेश्मा शेखला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलाही मूळची कर्नाटक राज्यातील असून ती 3 मुलींकडून वेश्या व्यवसायाचे काम करून घेऊन त्यातून पैसे कमावत असल्याचे पोलिसांना कबुली दिली आहे. Bhayandar Crime News
पोलिसांनी रेश्मा उस्मान शेख (28 वर्ष) च्या विरोधात काशिगांव पोलीस ठाण्यात Kashigaon Police Station तक्रार दाखल केली असून भारतीय न्याय संहीता 2023 चे 143(3) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Bhayandar Crime News