Mumbai Illegal Business मुंबईत अवैध धंद्यांना सामाजिक सुरक्षा विभागाचे बळ?( Enforcement Crime Branch), मुंबई अवैध धंद्यांच्या विळख्यात
Mumbai Illegal Business : मुंबईत अवैध धंद्याचा रावण मानगुटीवर बसला आहे, पोलिसासह सामाजिक सुरक्षा विभाग हतबल, आर्थिक समीकरणाचा कारवाईमध्ये पाया
मुंबई :- मुंबई शहराचे शहरीकरण आणि राहणीमानात दिवसेंदिवस होणारे बदल होत आहे. Mumbai Illegal Business लोकांच्या आवडीनिवडीच्या गोष्टींचा काही समाजकंटक लोक गैरफायदा घेताना दिसत आहेत. Mumbai Illegal Sex Racket मुंबईत बेकायदा धंद्यांना मोठ्या प्रमाणावर बळ आले आहे. Mumbai Police पोलिसांच्या आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या काही निवडक अधिकारांच्या बेकायदा धंद्याला दिलेल्या बळामुळे या बेकायदा धंद्याचा रावण मुंबईला गिळत आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित आहे.
मुंबईत, मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या बेकायदा धंद्याची यादीच समोर आली आहे. पोलीस प्रशासन आणि सामाजिक सुरक्षा विभाग यांच्या अर्थपूर्ण समीकरणामुळे या सर्व धंद्यांना कोणत्याही प्रकारे कारवाईला सामोरे जावे लागत नाही उलट खुल्या सर्रास प्रशासनाच्या सर्व नियमाला केराची टोपली दाखवून हत्तीच्या बळ आल्यासारखं हे धंदे राजरोसपणे शासनाच्या नाकावर टिचून चालवले जातात.
सामाजिक सुरक्षा ( Enforcement Crime Branch)विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत प्रश्नचिन्ह?
सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मागील सात ते दहा वर्ष बदल्याबाबत शाश्वत नाही. विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदली बाबत शासन कोणताही निर्णय घेत नाही शासनाच्या नियमाप्रमाणे एखाद्या विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या ठराविक कालावधीनंतर बदली होणे बंधनकारक असतानाही शासन बदलीबाबत का निर्णय घेत नाही. तसेच, या विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत ही शंका आहे जसे विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाईकरिता धाडसत्र करताना संबंध अवैध धंद्यांना त्यापूर्वीच पोलीस कर्मचारी ( ड्रायव्हर) महिला वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत पूर्व कल्पना दिली जाते. “तू मार मी रडायचे एक्टिंग करतो”, या पद्धतीचा कारभार सध्या या विभागामार्फत केला जात आहे.
मुंबईत कोणत्या कोणत्या धंद्यांना प्रशासनाचे अर्थपूर्ण बळ आहे
स्पा च्या नावाखाली सेक्स रॅकेट
ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली लेडीज डान्स बार
हुक्का पार्लर्स
कशाप्रकारे यांचे धंदे चालतात आलिम ही आलम है रेडकर मे
- पोलीस अधिकारी यांचे खास वसूलदार…
- वसूलदारांच्या चिरीमिरी अर्थसमीकरणामुळे-‘ ‘आलिम हि आलम हे रेडकर मे'( बांद्रा- खार)
- बांद्रा खार जुहू- यामध्ये चालत असलेल्या फुल सेक्स सर्विस ‘स्पा’ कधी कारवाई होणार.?
चाचा ही भतीजा हे भतिजा ही चाचा है- अशी वस्तुस्थिती वसूलदारांच्या अर्थसमीकरणामुळे झालेली आहे.प्रत्येक विभागाचे वसूलदार आपल्या अर्थसमीकरणामुळे कोणत्याही अवैध धंद्यावर कारवाई करत नाहीत अशी सूत्रांकडून माहिती आहे
स्पा व्यवसायातून हत्तीचे बळ आलेले आता चक्क वरिष्ठ लेव्हलवर सेटिंग लावून अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन गबरगंड झाल्याची खमंग चर्चा आहे. अनेक ठिकाणी या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल झाले असताना मोठ्या सेटिंग लावून ते पुन्हा जोमात सक्रिय झाल्याचे समजते. Mumbai Illegal Spa Racket
कोणत्या “स्पा”सेंटरमध्ये सेक्स रॅकेट चालते त्यांचे नाव, मालकांचे नाव आणि पोलीस ठाण्याचे हद्द!
१) मिझमार स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे
२) Cove स्पा :- खार पोलीस ठाणे
३) किंगस्टोन स्पा :- खार पोलीस ठाणे
४) अवाना स्पा :-खार पोलीस ठाणे
५) ZW स्पा :-डिएननगर पोलीस ठाणे
६) ड्रीम स्पा:- खार पोलीस ठाणे
७) रीफ्रेशिंग स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे
८) थाई सेन्सेस स्पा – वांद्रे पोलीस ठाणे
९) अर्बन स्पा :- वांद्रे पोलीस ठाणे
१०) बोधी वेलनेस स्पा – अंधेरी पोलीस ठाणे
११) बोधी वृक्ष स्पा – वांद्रे पोलीस ठाणे
१२) अर्बन थाई स्पा – जुहू पोलीस ठाणे
क्रमशः