मुंबई

Mumbai IAS Transfer : प्रशासकीय फेरबदलाचा नवा टप्पा! राज्य सरकारने पुन्हा एकदा चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या

Mumbai Latest IAS Transfer News : महत्त्वाच्या पदांवर नवे चेहरे; प्रशासनात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता

मुंबई | राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत पुन्हा एकदा मोठा फेरबदल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर, आता आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश शासनाने जारी केले आहेत. यामुळे राज्याच्या विविध महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नव्या नेतृत्वाची जबाबदारी आली आहे. Mumbai Latest IAS Transfer News

मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची बदली वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झाली आहे. तर अमरावतीचे महानगर आयुक्त सचिन कळंत्रे यांची नियुक्ती पुण्यातील ‘यशदा’ या प्रशासन प्रशिक्षण संस्थेच्या उपसंचालकपदी करण्यात आली आहे.

कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?

  1. पराग सोमण (IAS:SCS:2014) मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. सचिन कळंत्रे (IAS:SCS:2014) महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती यांची यशदा, पुणे येथील उपमहासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. सौम्या शर्मा-चांडक (IAS:RR:2018) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर यांची महापालिका आयुक्त, अमरावती महानगरपालिका, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. जिथिन रहमान (IAS:RR:2020) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago