क्राईम न्यूज

Mumbai Honey Trap News : इन्स्टाग्राम हनीट्रॅपनं फासला ‘शुभम’ जाळ्यात!

Mumbai Dharavi Police Latest News : मोबाईल-घरच्यांपासून दूर राहणारा आरोपी ‘हनीट्रॅप’च्या गळ्यात,धारावी पोलिसांची शक्कल यशस्वी; नाशिकमधून पकड, रुग्णालयात दाखल

मुंबई :- धारावीमध्ये एका तरुणावर चाकू हल्ला करून पसार झालेल्या शुभम कोरी (19 वय) या तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी इन्स्टाग्रामचा वापर करून ‘हनीट्रॅप ऑपरेशन’ रचले आणि आरोपीला अलगद गजाआड केले. Mumbai Honey Trap मोबाईल बंद, कुटुंबीयांपासून संपर्क तोडलेला, समाजात पूर्णपणे अदृश्य झालेला शुभम पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरला होता. Mumbai Dharavi Police Latest News

हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
धारावीत राहणाऱ्या शुभमचा काही दिवसांपूर्वी एका तरुणाशी वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर शुभमने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गुन्हा घडल्यानंतर तो फरार झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजा बिडकर, निरीक्षक अशोक उगले, उपनिरीक्षक विकास शेलार यांच्या पथकाने शोधमोहीम सुरू केली होती.

पोलिसांच्या गळ्यात न अडकण्यासाठी प्रयत्नशील शुभम… पण सोशल मीडियावर होता अ‍ॅक्टिव्ह!
शुभमने मोबाईल वापरणं बंद केलं, कुटुंबाशी संपर्क तोडला, त्यामुळे त्याचा माग काढणं अत्यंत कठीण होतं. पण त्याचवेळी तो इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असल्याचे पोलीस पथकाला कळले.

हनीट्रॅप ऑपरेशनचा मास्टरस्ट्रोक!
धारावी पोलिसांनी त्याचा सायबर ठाव घेत एका बनावट तरुणीच्या खात्याद्वारे शुभमशी संपर्क साधला. शुभमने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताच चॅटिंग सुरू झालं आणि तो नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली.

शुभमला लहानपणापासून मिरगीचा आजार आहे. त्याला अटक करताना चक्कर येऊन पडल्याने नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर त्याला धारावी पोलिसांनी भावाच्या उपस्थितीत मुंबईत आणलं आणि शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केलं.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago