क्राईम न्यूज

Mumbai Home Fraud News : म्हाडाच्या घरांचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक! – आर्थिक गुन्हे शाखेकडून पाहिजे आरोपी जितेंद्र राठोड चेंबूरमधून अटकेत

Mumbai Latest Mahada Home Fraud News : मुंबई आणि ठाण्यात नागरिकांना स्वस्त फ्लॅट देण्याचे आश्वासन; तब्बल 8 गुन्ह्यांत वॉन्टेड आरोपी जेरबंद; फसवणुकीची रक्कम 2 कोटींहून अधिक

मुंबई :- मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये नागरिकांना स्वस्तामध्ये म्हाडाची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे. Mumbai Crime Branch Latest News

गुन्ह्याचे स्वरूप आणि फसवणूक

​माझगाव येथील सारा जोखीम फर्नाडिस (वय 50) यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी श्रीमती बेला डिसुझा आणि इतरांनी संगनमत करून तक्रारदार तसेच इतर बळीत व्यक्तींना शासकीय कोट्यातून कमी किमतीत म्हाडाचे फ्लॅट खरेदी करून देतो, असे आमिष दाखवले.

​आरोपींनी नोव्हेंबर 2012 ते 2019 या काळात वेळोवेळी फिर्यादी आणि साक्षीदारांकडून त्यांच्या बँक खात्यांवर आणि रोख स्वरूपात 70 लाख 8 हजार 900 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रक्कम स्वीकारली.
​फसवणूक करण्यासाठी आरोपींनी म्हाडाच्या नावे फ्लॅटचे बनावट वाटप पत्रे तयार केली आणि ती खरी असल्याचे भासवून, मिळालेल्या रकमेचा अपहार केला.
​तपासामध्ये फसवणुकीची ही रक्कम दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

​वॉन्टेड आरोपी अटकेत

​आर्थिक गुन्हे शाखेने पाहिजे आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि ग्राउंड वर्कच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार आणि त्यांच्या पथकाने आज (11 डिसेंबर ) रोजी आरोपी जितेंद्र सुखलाल राठोड (वय 53) यास चेंबूर, मुंबई परिसरातून अटक केली आहे.

​अटक करण्यात आलेला आरोपी जितेंद्र राठोड हा मुंबईतील शिवाजी पार्क, दादर, दिंडोशी, वनराई, समतानगर, नेहरू पोलीस ठाणे तसेच ठाणे जिल्ह्यातील वसई येथील आचोले आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात Manikpur Police Station दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता. Mumbai Latest Crime News

​नागरिकांना आवाहन

​ज्या नागरिकांची आरोपी जितेंद्र सुखलाल राठोड याने स्वस्तामध्ये म्हाडाची घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे, त्यांनी त्वरित आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

vivek

Recent Posts