Mumbai Hit & Run : मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रन घटना बीएमडब्ल्यू नंतर आता ऑडी कारने हिट अँड रन
Mumbai Hit & Run : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ऑडी चालकाने दोन रिक्षा चालकाला उडविले प्रवाशीही जखमी..
मुंबई :- पोर्श, बीएमडब्ल्यू नंतर आता ऑडी कारने हिट अँड रन, प्रकारात पुन्हा एकदा समोर आली पुणे आणि वरळी येथील हाय प्रोफाईल हिट अँड रन प्रकरणानंतर आता ऑडी कार Audi Hit And Run ने मुलुंड मध्ये मध्य मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने दोन रिक्षा धडक मारून त्यांना जखमी केल्याचे घटना सोमवारी समोर आली आहे. या घटनेत एकूण चार जण जखमी झाले असून ऑडी चालक विजय गोरे (43 वर्ष) याला कांजूरमार्ग येथून अटक करण्यात आली आहे. Mumbai Hit And Run Case
कांजूर येथे राहणारा विजय गोरे सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ऑडीने मुलुंडमधील डम्पिंग रोडवरून भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. वेगात असलेल्या ऑडीने समोरून येणाऱ्या रिक्षेला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की अपघातग्रस्त रिक्षा अन्य रिक्षावर आपटली. दोन्ही रिक्षांचे चालक आणि दोन प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले. ऑडीचालक गोरेने घटनास्थळावरून पळ काढला.
मोबाइलही त्याने कारमध्येच सोडून दिला. गोरेविरोधात मुलुंड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 281, 125 (अ) (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 184, 134 अन्वये गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. या अपघातात प्रवासी प्रकाश जाधव (46 वर्ष), हेमंत चव्हाण (57 वर्ष) यांच्यासह रिक्षाचालक संतोष वालेकर आणि आकाश जयस्वाल जखमी झाले आहेत. Mumbai Hit And Run Case
गाडीची नोंदणी आणि मोबाइल आधारे पोलिसांना आरटीओकडून गोरेची माहिती आणि मालाडच्या घरचा पत्ता मिळाला. ही गाडी मालाडच्या घरावर नोंद होती. मात्र, तेथून तो कांजूरमार्ग परिसरात राहण्यास आल्याचे समजताच पोलीस पथकाने कांजूरचे घर गाठले. कांजूरचे घरही बंद असल्याने गोरेला कांजूर पूर्वेकडील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. अपघातावेळी तो दारू पिला होता. गोरे याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्याची तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे पाठवण्यात आले आहे.