Mumbai High Court On India France Flex Board : पायी चालणाऱ्यांची अडचण; विमानतळ ते कुलाबा रस्ते फलकांनी झाकले; वाऱ्यामुळे फलक पडल्याने अपघाताची भीती
मुंबई | फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या स्वागतासाठी मुंबईत जंगी तयारी करण्यात आली आहे. मात्र, या स्वागताच्या उत्साहात मुंबईच्या सौंदर्याचा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचा पुरता बोजवारा उडाला आहे. मंत्रालय, मलबार हिल आणि ‘लोक भवन’ परिसरातील पदपथांवर जागोजागी लावण्यात आलेल्या महाकाय फलकांमुळे सर्वसामान्यांच्या चालण्याच्या वाटाच बंद झाल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशांना केराची टोपली?
सार्वजनिक ठिकाणे, रस्ते आणि चौकांमध्ये अनधिकृत फलक लावण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक बंदी घातली आहे. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला फटकारूनही, एका मोठ्या आंतरराष्ट्रीय दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याच चुकांची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. विमानतळ ते मंत्रालय आणि मंत्रालय ते ताज हॉटेल या मार्गावर अस्ताव्यस्तपणे लावलेल्या या फलकांमुळे मुंबईचे रूप विद्रूप झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पदचाऱ्यांचा जीव टांगणीला
केवळ सौंदर्याचा प्रश्न नसून, हे फलक पदचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरत आहेत. अनेक ठिकाणी पदपथाच्या मध्यभागीच लोखंडी सांगाडे उभे करून फलक लावले गेले आहेत. समुद्रकिनारी सोसाट्याचा वारा असल्याने काही फलक निखळून रस्त्यावर पडल्याचेही दिसून आले आहे. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या फलकांवर मॅक्रॉन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो झळकत आहेत.
प्रशासनाकडून दुर्लक्ष
एकीकडे ‘स्वच्छ मुंबई’चा नारा दिला जात असताना, दुसरीकडे राजकीय पोस्टरबाजीने पदपथ अडवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. “परदेशी पाहुण्यांचे स्वागत जरूर करा, पण मुंबईकरांना चालण्यासाठी असलेल्या पदपथांचा बळी देऊन हे स्वागत कशासाठी?” असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. या फलकांवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली असून, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…