Mumbai Latest News : विमानतळांवर ‘3 तास अगोदर पोहोचा’ सूचना; कल्याण स्टेशनवर नाकाबंदी; मुंबईची सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई :- राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात Delhi Bomb Blast 9 जणांनी प्राण गमावल्यानंतर, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही तातडीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी मुंबईतील प्रमुख आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. Mumbai High Alert
सीएसटीवर संयुक्त तपासणी
मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी टर्मिनस (CSMT) येथे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, पोलिसांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीएसएमटी येथे आरपीएफ (RPF) आणि जीआरपी (GRP) संयुक्तपणे तपासणी करत आहेत. तसेच, डॉग स्क्वॉडमार्फत संशयित प्रवाशांची बॅग किंवा वस्तूची कसून चौकशी केली जात आहे. मुंबईतील माहीम रेती बंदर जवळही पोलीस अलर्टवर असून सागरी किनाऱ्यांवर लक्ष ठेवून आहेत.
सिद्धीविनायक मंदिरात कडक सुरक्षा
मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी विचारात घेऊन, मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी तातडीने पोलीस प्रशासनासोबत सुरक्षा आढावा घेतला. त्यानुसार, येणाऱ्या भाविकांची तपासणी कडक करण्यात आली असून, मंदिर परिसरात पोलीस सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पोलीस बंदोबस्त
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातही दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. स्टेशन परिसरात कल्याण पोलिसांचे पथक दाखल झाले आणि त्यांनी नाकाबंदी करत वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी केली. एसीपी कल्याणजी घेटे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कल्याण पोलीस अलर्ट मोडवर असल्याचे स्पष्ट केले आहे.
विमानतळांसाठी विशेष सूचना
या घटनेनंतर भारतातील सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आकासा एअरलाईन्सने ट्विट करून प्रवाशांना प्रस्थानाच्या किमान 3 तास आधी विमानतळावर पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, चेक-इन बॅगेज व्यतिरिक्त, 7 किलो वजनाची फक्त 1 हँडबॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व प्रवाशांना बोर्डिंगपूर्वी दुय्यम सुरक्षा तपासणी (Secondary Security Check) करणे आवश्यक असणार आहे.
दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईची पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली असून, प्रत्येक संवेदनशील ठिकाणावर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…