Mumbai High Alert : मुंबईत मुसळधार पावसानंतर आता हायटायड अलर्ट, लोकांनी समुद्राच्या जवळ जाण्यास टाळा प्रशासनाचे आवाहन!
Mumbai Rain Live Updates : मुंबईत मुसळधार पावसामुळे हाय टायड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांनी समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने दिले आहे
मुंबई :- मुंबईत मुसळधार पावसानंतर Mumbai Rain आता हाय टाईडचा धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील मरीन ड्राइव्हवर भरतीच्या लाटा उसळत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही परिस्थिती पाहता भारतीय हवामान खात्याने हाय टायड अलर्ट जारी केला आहे. Mumbai High Tide Alert याशिवाय येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतील समुद्राची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या स्थितीत मरीन ड्राइव्ह आणि इतर किनारी भागात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. Mumbai Rain Live Updates
भरती-ओहोटीची परिस्थिती पाहता प्रशासनाने लोकांना समुद्र किनाऱ्यावर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच पुढील काही दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशाराही भारतीय हवामान खात्याने दिला आहे. लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि हवामानाच्या माहितीवरही लक्ष ठेवावे, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या अजूनही कायम आहे. Mumbai Rain Live Updates