Mumbai Breaking News : कुर्ला येथील बस डेपोजवळील पाण्याच्या खड्ड्यात बुडून 7 वर्षीय निष्पापाचा मृत्यू!
Mumbai Breaking News : या घटनेमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापन आणि बस डेपोबाहेर खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध एफआयआर नोंदविण्याची मागणी केली.
मुंबई :- कुर्ला पूर्व येथील एमएसआरटीसी बस डेपोबाहेर झालेल्या अपघातात सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. Mumbai Kurla Accident News शनिवारी सायंकाळी डेपोबाहेर असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात हे बालक पडले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या Nehru Nagar Police Station अधिकाऱ्याने सांगितले की, मुलाचे नाव उज्ज्वल सिंह असे आहे. तो जवळच्या मिलननगर झोपडपट्टीत राहत होता. मुलाला वाचवण्यासाठी घाटकोपरच्या राजा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा एसटी डेपोजवळील मिलन नगरमध्ये राहत होता. तो मित्रांसोबत खेळण्यासाठी एसटी डेपो कॉम्प्लेक्समध्ये गेला होता जेथे बांधकाम सुरू होते.येथे एक खड्डा खोदण्यात आला होता जो पाण्याने भरला होता. घटनेची माहिती मिळताच रस्त्याने जाणाऱ्यांनी त्याला खड्ड्यातून बाहेर काढले आणि घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.