Mumbai GRP Consatable News : मुंबईच्या ट्रेनच्या गर्दीने पोलिसाचा घेतला बळी, ट्रेनमधून पडून जीआरपी कॉन्स्टेबलचा मृत्यू
Railway police constable died after falling from an overcrowded train in Mumbai : समित ज्ञानेश्वर गोंदके असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून तो अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तैनात होता. ड्युटी संपवून ते डोंबिवली येथील घरी निघाले होते.
मुंबई :- मुंबईत लोकल ट्रेनमध्ये Mumbai Local Train Crowed गर्दी झाल्याने एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. लोकल ट्रेनमधून पडून जीआरपी कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला Mumbai GRP Constable Died In The Train आहे.जीआरपी पोलिस हवालदार गंभीर अवस्थेत सहा ते सात तास रेल्वे रुळावर पडून होते. मुसळधार पाऊस आणि गर्दीमुळे वेळीच मदत न मिळाल्याने हवालदाराला आपला जीव गमवावा लागला आहे. Mumbai Latest News
समित ज्ञानेश्वर गोंदके (वय 28) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून तो अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात Andheri Railway Station तैनात होता, असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी आपली ड्युटी संपवून जीआरपी कॉन्स्टेबल गोंदके हे डोंबिवली येथील आपल्या घराकडे निघाले होते, त्याच दरम्यान हा अपघात झाला. Mumbai Latest News
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊच्या सुमारास अंधेरी ते घाटकोपर असा मेट्रोने प्रवास केल्यानंतर उरलेल्या प्रवासासाठी ते लोकल ट्रेनमध्ये चढले. भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो चालत्या लोकल ट्रेनमधून पडला. खाली पडल्याने हवालदार गंभीर जखमी झाला. ज्यामध्ये खांद्यावर, हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून समित ज्ञानेश्वरला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारास उशीर झाल्याने त्याला मृत घोषित करण्यात आले. कॉन्स्टेबलची ओळख त्याच्या गणवेशावरून आणि ओळखपत्रावरून झाली. Mumbai Latest News