क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Govandi News : गोवंडीतील भीषण अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ; माजी नगरसेविकेसह 8 जणांवर गुन्हा दाखल

Mumbai Govandi Latest News : मुंबईत लागू असलेल्या कलम 144 चं उल्लंघन; पोलिसांचा पुढील तपास सुरू

मुंबई | गोवंडी परिसरात नुकत्याच घडलेल्या भीषण रस्ते अपघातानंतर निर्माण झालेल्या गोंधळप्रकरणी देवनार पोलिसांनी Mumbai Devnar Police News मोठी कारवाई करत माजी नगरसेविका रुखसाना सिद्दीकी यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Mumbai Police Latest News

14 जून रोजी गोवंडी परिसरात भरधाव डंपरने चार दुचाकीस्वारांना चिरडले, ज्यात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात संतापाचा भडका उडाला आणि अंदाजे 1000 ते 1200 लोकांचा जमाव रस्त्यावर उतरला.

पोलिसांच्या माहितीनुसार, रुखसाना सिद्दीकी, आबिद अब्बास सय्यद, एजाज उर्फ गुड्डू, आतिफ शेख, शब्बीर शेख, इरशाद कुरैशी, हकीउल्लाह खान आणि मुश्ताक शेख या आरोपींनी कोणतीही पोलिस परवानगी न घेता मोठी गर्दी गोळा केली. त्यांनी रस्त्यावर अडथळा निर्माण केला आणि पोलिसांच्या आवाहनालाही प्रतिसाद दिला नाही.

मुंबईत सध्या जमावबंदी लागू असून, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येण्यास बंदी आहे. मात्र या सर्वांनी प्रशासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान दिलं.

सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, घटनेच्या सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे. संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0