•शिवशाही बस आणि CNG ट्रकची जोरदार धडक; 7 प्रवासी जखमी, CNG गळतीच्या भीतीने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवली!
माणगाव (रायगड) :- रायगड जिल्ह्यातील माणगावजवळ कळमजे परिसरात आज सकाळी मुंबई–गोवा महामार्गावर शिवशाही बस आणि सीएनजी सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या धडकेत बसमधील सात प्रवासी जखमी झाले असून, घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
अपघात आणि धोका
मुंबईहून मालवणच्या दिशेने जाणारी शिवशाही बस आणि सीएनजी सिलिंडर असलेला ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात शिवशाही बसच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.
सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे, जोरदार धडकेमुळे ट्रकमधून सीएनजी गॅस गळतीची शक्यता निर्माण झाली आहे.
कोणतीही मोठी दुर्घटना (स्फोट) टाळण्यासाठी माणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवली.
प्रवाशांचा खोळंबा, यंत्रणा दाखल
वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सीएनजी गळतीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि गळती रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या सात प्रवाशांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. माणगाव पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…