Mumbai Ganpati Traffic Update : पोलिसांचे आवाहन: प्रवासासाठी लोकल आणि बेस्ट बसचा वापर करा; कोस्टल रोडचाही पर्याय उपलब्ध
मुंबई :- मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल केले आहेत. गणेश विसर्जनासाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, आज (6 सप्टेंबर) दुपारी 12 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजेपर्यंत काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.
हे आहेत महत्त्वाचे बदल आणि
पर्यायी मार्ग
• वाहनांना प्रवेश बंद: आज सकाळी 7 वाजेपासून ते 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण बृहन्मुंबई परिसरात अवजड वाहनांना प्रवेश बंद असेल.
• कोस्टल रोडचा वापर: उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईकडे किंवा उलट दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना कोस्टल रोड (धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग) वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण वाहतूक विभागातील रस्ते बंद
• कुलाबा: नाथालाल पारेख मार्ग आणि कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील. वाहतूक कॅ. प्रकाश पेठे मार्ग आणि साधू टी. एल. वासवानी मार्गाने वळवली जाईल.
• मरीन ड्राईव्ह: नेताजी सुभाषचंद्र बस मार्ग (मरीन ड्राईव्ह) आवश्यकतेनुसार वाहतुकीसाठी बंद राहील.
• आझाद मैदान: महानगरपालिका मार्ग बंद राहील. वाहतूक डी. एन. रोड एल. टी. मार्गे वळविण्यात येईल.
• काळबादेवी: जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग आणि बाबा साहेब जयकर मार्ग हे रस्ते आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येतील. वाहतूक महर्षी कर्वे मार्ग आणि एन. एस. रोडने वळवली जाईल.
सार्वजनिक वाहतुकीचे आवाहन
मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा, म्हणजेच बेस्ट बस आणि लोकल ट्रेनचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल ट्रेन रात्रभर सुरू राहणार आहेत.
मुंबईत यंदा गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी, पवई गणेश घाट यांसारख्या प्रमुख ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करून उत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…