Mumbai Ganpati Visarjan Latest Update : सुरक्षेसाठी 10 हजार कर्मचारी, 2178 जीवरक्षक तैनात; नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मुंबई :- गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पूर्णपणे सज्ज झाली आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी महापालिकेने 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि सुमारे 290 कृत्रिम तलाव तयार केले आहेत.
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून याची तयारी सुरू होती. सुरक्षिततेसाठी तब्बल 10 हजार अधिकारी-कर्मचारी आणि 2,178 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.
सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था
वाहनांची सोय: चौपाट्यांवर वाहने अडकू नयेत यासाठी 1,175 स्टील प्लेट्स टाकण्यात आल्या आहेत.
कृत्रिम तलाव: नागरिकांना मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या तलावांची माहिती बीएमसीच्या संकेतस्थळावर (www.mcgm.gov.in) उपलब्ध आहे.
आरोग्य सेवा: 245 नियंत्रण कक्ष, 236 प्रथमोपचार केंद्रे आणि 115 रुग्णवाहिका सज्ज आहेत.
प्रकाश व्यवस्था: रात्रीच्या विसर्जनासाठी 6,188 फ्लडलाइट्स आणि 138 सर्चलाइट्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
इतर सुविधा: विसर्जन स्थळांवर 42 क्रेन, 287 स्वागत कक्ष, 594 निर्माल्य कलश आणि 197 तात्पुरती शौचालये उपलब्ध आहेत.
नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
समुद्राच्या खोल पाण्यात जाणे टाळावे.
विशेषतः लहान मुलांची काळजी घ्यावी.
ब्लू बटन जेलीफिश आणि स्टिंग रे यांसारख्या जलचरांपासून सावध राहावे. मत्स्यदंश झाल्यास लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.
कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
या सर्व व्यवस्थेमुळे मुंबईतील गणेश विसर्जन शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…