मुंबई
Trending

Sanjay Raut : “शिंदेंनी अमित शाहांकडे दिली ‘मुख्यमंत्रिपदासाठी पक्षविलीनीकरणाची’ तयारी”,संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Sanjay Raut On Eknath Shinde : शिंदेंचा फडणवीसांवर रोष? – “काम करू देत नाहीत, आमदारांच्या चौकशा लावतात”

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचा नुकताच झालेला दिल्ली दौरा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा खळबळजनक वळण घेऊन आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा अचानक दौरा आधीच संशयाच्या भोवऱ्यात असताना, आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केलेल्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ‘गुरुपौर्णिमा’ निमित्त पूजा करत “मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या बदल्यात पक्षच भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवली.” राऊतांनी दावा केला की, “शिंदेंनी अमित शाह यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला आणि मुख्यमंत्रीपद हाच सर्व समस्यांवर उपाय असल्याचं म्हटलं.”

राऊत पुढे म्हणाले की, “शिंदेंना वाटतं मराठी माणसांची एकजूट ही महायुतीसाठी धोका ठरू शकते आणि तिचं विभाजन आवश्यक आहे. यासाठी शाह यांचे लक्ष या विषयाकडे वेधण्यात आले. शिंदेंची मांडणी होती – जर मला मुख्यमंत्री केलं, तर मी सगळं शांत करीन.”

अमित शाह यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं की, “महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच असेल.” मात्र, त्यावर शिंदेंनी आपल्या संपूर्ण पक्षासह भाजपात विलीन होण्याची तयारी दर्शवत मुख्यमंत्रिपदाची मागणी ठामपणे मांडली, असा गंभीर आरोप राऊतांनी केला.

दरम्यान, या दाव्यांवर शिंदे गट किंवा भाजपाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण राऊतांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला नव्याने राजकीय परिमाण मिळालं असून, आगामी राजकारणात महत्त्वाचा घडामोडींचा सूर इथूनच ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0