Mumbai Latest Fraud News : दागिने दुप्पट करण्याचे आमिष, घरात गुप्तपणे ठेवलेली ‘पवित्र’ डबी; माहिम पोलिसांकडून फरार आरोपी कादरीचा शोध सुरू!
मुंबई (माहिम) :- मुंबईतील माहिम परिसरात पैगंबर मोहम्मद यांच्या वंशाचा धाक दाखवून एका कुटुंबाची तब्बल 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने कुटुंबातील महिलांचा धार्मिक श्रद्धांवर विश्वास संपादन करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पळ काढला. याप्रकरणी माहिम पोलीस ठाण्यात Mahim Police Station गुन्हा दाखल करण्यात आला असून, सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. Mahim Latest Fraud News
नेमका काय घडला प्रकार?
माहिम येथे राहणारे अन्सार अहमद अब्दुल गनी यांनी या फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. फसवणुकीची सुरुवात 2022 मध्ये झाली. अन्सार आणि त्यांचा भाऊ इसरार फारुकी यांची दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यावर कादरी नावाच्या व्यक्तीशी भेट झाली.
यावेळी कादरीने आपण पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असून, आपल्याकडे त्यांचे पवित्र केस असल्याची बतावणी केली. यावर विश्वास ठेवून दोन्ही भावांनी त्याला माहिम येथील घरी बोलावले.
‘पवित्र डबी’ आणि फसवणुकीचा डाव
कादरी घरी आला तेव्हा तो एका काचेच्या डब्ब्यात एक केस घेऊन आला होता. तो पैगंबरांचा असल्याचे सांगून त्याने त्या डब्ब्यासोबत काही विधी केले आणि ती डबी घरातील कपाटात गुप्तपणे ठेवण्यास सांगितली. ‘जोपर्यंत मी सांगत नाही, तोपर्यंत ही डबी उघडायची नाही,’ अशी सक्त ताकीद त्याने दिली.
काही दिवसांनी दोन्ही भाऊ बाहेर असताना कादरी पुन्हा घरी आला. त्याने दोन्ही भावांच्या पत्नींना भेटून सांगितले की, जर त्यांनी आपले सर्व दागिने त्या पवित्र डबीजवळ ठेवले, तर ते दागिने दुप्पट होतील आणि घरात प्रचंड पैसा वाढेल.
धार्मिक श्रद्धा आणि अधिक संपत्तीच्या आमिषाने दोन्ही महिलांनी सुमारे 11 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्या डबीजवळ ठेवले. त्यानंतर काही विधी करायचे आहेत, असे सांगून कादरीने महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. महिला बाहेर जाताच कादरीने कपाटातील दागिने घेऊन पळ काढला.
फसवणूक उघड, विशेष पथक कामाला
काही दिवसांनी महिलांनी ही घटना पतींना सांगितली, तेव्हा आपली गंभीर फसवणूक झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने माहिम पोलीस स्टेशन गाठून कादरीविरोधात फसवणूक आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.
माहिम पोलिसांनी या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विशेष पथक तयार केले असून, आरोपी कादरीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…