Mumbai Diamond Fraud News : ग्राहक म्हणून आलेल्या व्यक्तीच्या साथीदारानेच हिरे पळवले,बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबई :- गुजरात येथील एका हिरे व्यापाऱ्याचे तब्बल 3 कोटी रुपयांचे हिरे मुंबईत पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिऱ्यांच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने पाठवलेल्या व्यक्तीनेच हा अपहार केला असून, या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात Borivali Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News
गुजरातमधील सुरत येथे राहणारे हिरे व्यापारी शील कोरडिया (वय 21) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शील यांची वडिलोपार्जित ‘लेल्सिंग डायमंड’ नावाची कंपनी असून, ते अनेक शहरांमध्ये व्यवसाय करतात. त्यांचे नियमित ग्राहक चैतन्य मेहता यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांच्याकडे 666.65 कॅरेटच्या हिऱ्यांची ऑर्डर दिली होती, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये होती.
हे हिरे घेण्यासाठी चैतन्य मेहता यांनी त्यांचे परिचित जिमित आणि रकीन या दोघांना गुजरातमधील नवसारी येथे पाठवले. 6 सप्टेंबर रोजी त्यांनी शील कोरडिया यांच्या कंपनीतून हे हिरे ताब्यात घेतले. त्यानंतर, मेहता यांनी हे हिरे विक्रम संघवी याला मुंबईत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, जिमित आणि रकीन यांनी हे हिरे विक्रम संघवीला दिले.
मुंबईत हिरे पोहोचलेच नाहीत
हिरे घेऊन विक्रम संघवी मुंबईसाठी निघाला होता. मात्र, हे हिरे मुंबईत पोहोचलेच नाहीत. उलटपक्षी, विक्रम संघवीने त्याला हिरे मिळाले नसल्याचा दावा केला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर, विक्रम संघवीनेच हिऱ्यांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी, शील कोरडिया यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बोरीवली पोलिसांनी आरोपी विक्रम संघवी याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (2) आणि 316 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे हिरे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…