Mumbai Fraud Job : परदेशात नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेकांची फसवणूक, एका आरोपीला अटक
Mumbai Crime Branch Arrested Fraudster : गुन्हे शाखा कक्ष-8 यांचे छापेमारी, आरोपीला अटक करून त्याच्याजवळून तब्बल 55 सिमकार्ड जप्त
मुंबई :- परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून Abroad Job Fraud In Mumbai बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-8 च्या Mumbai Crime Branch 8 पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्या जवळून तब्बल 55 वेगवेगळ्या कंपनीचे सिम कार्ड जप्त केले आहे. परदेशात तरुणांना नोकरी देतो असे सांगून लाखो रुपये घेऊन बनावट वर्क परमिट देऊन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम द्रुतगती मेट्रो स्टेशन जवळ अंधेरी येथे सुमित बिजनेस बे या ठिकाणी E AXIS IMMIGRATION SERVICE PVT. LTD नावाचे बनावट ऑफिस सुरू करण्यात आले होते. या ऑफिसमध्ये बेरोजगार तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम स्वीकारून त्यांना बनावट वर्क परमिट लेटर देण्यात येत होते. तसेच बेरोजगार तरुणांकडून मोठी रक्कम घेऊन ती परत न देण्याचे व त्यांचे फसवणूक करत असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष-8 मिळाली होती. यामध्ये एका तरुणाची फसवणूक झाली होती. त्या तरुणाने एमआयडीसी पोलीस ठाणे येथे कलम 319 (2) ,318 (4),336 (2),336(3),340(2),61(2) नोंदवण्यात आला होता. तरुणाची तक्रार पुढील तपासाकरिता गुन्हे शाखा कक्ष-8 यांना वर्ग करण्यात आली होती. पोलिसांनी अंधेरी येथील कार्यालयात छापा टाकत बनावट परदेशी नोकरी देणाऱ्या मालकाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी छापेमारीत वोडाफोन कंपनीचे 45 सिम कार्ड, जिओ कंपनीचे दहा सिम कार्ड, आठ लॅपटॉप, 1 डेस्कटॉप 2 मोबाईल फोन, दोन बनावट स्टॅम्प रोख रक्कम असा एकूण एक लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच व्हिजिटिंग कार्ड व इतर कागदपत्र ही पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्या आरोपीचे नाव कृष्णा कमलाकांत त्रिपाठी (52 वर्ष) आहे. Mumbai Latest Crime News
पोलीस पथक
पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई), विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई), देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना,पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1), विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डीपश्चिम), राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-8 चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, संग्राम पाटील, राहुल प्रभु, पोलीस उपनिरीक्षक अरविंद मोरे, विकास मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, पोलीस हवालदार यादव, कांबळे, पोलीस शिपाई रहेरे, सटाले, बिडवे, महिला पोलीस शिपाई भिताडे यांनी पार पाडली आहे. Mumbai Latest Crime News