मुंबई

Mumbai Fire News : जसलोक हॉस्पिटलजवळील शोरूममध्ये आग, अग्निशमन दलाने 6 तासांनंतर आग विझवली

Mumbai Latest Fire News : सोमवारी सकाळी मुंबईतील नाना चौकातील सुखशांती इमारतीला भीषण आग लागली. जसलोक हॉस्पिटलजवळील लिबास शोरूमच्या दुकान क्रमांक 2 आणि 3 पासून आग लागली.ही आग शोरूममधील विद्युत वायरिंग, कपड्यांचा साठा आणि इतर उपकरणांपर्यंत मर्यादित होती, परंतु तरीही, परिसरात दाट धूर पसरला, ज्यामुळे परिसरात भीती आणि घबराट पसरली.

मुंबई :- दक्षिण मुंबईतील ग्रॅण्टरोड येथील पेडर रोड परिसरातील सहा मजली सुखशांती इमारतीत आज सकाळी भीषण आग लागली. या इमारतीत असलेल्या ‘लिबास’ या कपड्यांच्या दुकानाला आग लागली होती. आगीत कोणी जखमी झाले नाही. वरच्या मजल्यांवरून अग्निशमन दलाने 8 जणांसह, श्वान आणि मांजरीची सुखरूप सुटका केली आहे.

सोमवारी सकाळी ग्रॅण्टरोड येथील पेडररोड या उच्चभ्रू परिसरात एका सहा मजली इमारतीत सकाळी पावणे आठ वाजता आग लागली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. अग्निशमन दलाने पहिल्या मजल्यावरून चार पुरुष आणि चौथ्या मजल्यावरून चार महिला, तीन कुत्रे व दोन मांजरींना सुरक्षितपणे बाहेर काढले.

शोरूममधील विद्युत यंत्रणा, विद्युत उपकरणे आणि कपड्यांना लागली होती. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धूर पसरला होता. या आगीत शोरूम मधील महागडे कपडे मोठ्या प्रमाणावर जळाले आहेत. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

vivek

Recent Posts