महाराष्ट्र
Trending

Mumbai Fire News : गोरेगाव चित्रनगरीत पहाटे आग; ‘बिग बॉस मराठी’ सेटच्या मागील भागाला झळा

Mumbai Goregaon Fire News : अन्नपूर्णा सेटवरील तंबूमध्ये लागली आग; जीवितहानी टळली

मुंबई | आज (सोमवार) पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील अन्नपूर्णा सेटवर आग लागल्याची घटना घडली. ही आग ‘बिग बॉस मराठी’ कार्यक्रमाच्या सेटच्या मागील बाजूस उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये लागली. Mumbai Latest Fire News

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने या आगीची लेव्हल-1 अशी नोंद केली असून, घटनास्थळी 4 अग्निशमन गाड्या, 4 जम्बो टँकर, 1 अ‍ॅडिशनल डिव्हिजनल फायर ऑफिसर आणि 3 स्टेशन अधिकारी तात्काळ दाखल झाले होते.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी वा जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. संबंधित विभागाकडून आगीच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0