Ex-Shiv Sena Corporator Kamlesh Rai Arrested for Extortion : अंधेरीतील बांधकाम व्यावसायिकाकडून 35 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; पोलिसांनी 5 लाख घेताना अटक केली
मुंबई :- अंधेरीतील एका बांधकाम कंत्राटदाराकडून 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) चे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. खंडणीच्या रकमेपैकी 5 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू होते. या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या नसल्याची धमकी देत माजी नगरसेवक कमलेश राय यांनी कंत्राटदाराकडे 35 लाख रुपयांची खंडणी मागितली. धमकी दिल्यानंतर कंत्राटदाराने खंडणीच्या पहिल्या टप्प्यात 8 लाख रुपये राय यांना दिले होते. मात्र, त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्याने अखेर कंत्राटदाराने पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी सापळा रचून पकडले
कंत्राटदाराच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले. शुक्रवारी राय हे आणखी 5 लाख रुपये घेण्यासाठी बांधकाम साइटवर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचला आणि पाच लाख रुपये स्वीकारत असताना कमलेश राय यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून कंत्राटदाराच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
कमलेश राय यांनी मार्च 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. राय पती-पत्नी यांचा अंधेरीतील विमानतळ परिसरातील प्रभागात मोठा दबदबा असून, गेली 22 वर्षे ते या भागातून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. कमलेश राय स्वतः तीन वेळा, तर त्यांच्या पत्नी सुषमा राय दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी ते काँग्रेस आणि शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यरत होते.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…