•पलावा वसाहतीतील डाऊन टाऊन सदनिकेत छापा; 2 युवक आणि 1 तरुणी अटकेत
डोंबिवली | डोंबिवलीतील खोणी पलावा वसाहतीसारख्या उच्चभ्रू वसाहतीतून अंमली पदार्थ विक्रीचा मोठा प्रकार समोर आला आहे. मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री अचानक टाकलेल्या छाप्यात सुमारे 2 किलो ‘मेफेड्रोन (MD)’ पावडर जप्त करण्यात आली असून, त्याची अंदाजे बाजारमूल्य दोन कोटी रुपये आहे.
या कारवाईत 20 ते 26 वयोगटातील दोन तरुण आणि एका 21 वर्षीय तरुणीला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या महिलेकडून अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी सहाय्य होत असल्याचे समोर आले आहे.
मानपाडा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी डाऊन टाऊन इमारतीत छापा टाकला. रात्री 11 च्या सुमारास पोलिसांनी संबंधित सदनिकेत छापा टाकला असता, तिथे तिघे जण उपस्थित होते. यामध्ये एका इसमाकडे थेट एमडी पावडर जप्त करण्यात आली, तर उर्वरित दोनजण सुटकेचा प्रयत्न करत पळाले. मात्र पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवून त्यांनाही ताब्यात घेतले.
पोलिसांचे म्हणणे आहे की, सदर महिला हे अंमली पदार्थ विक्रीचं मध्यस्थीचं काम करत होती. हे संपूर्ण प्रकरण सुसंघटित टोळीचे कारस्थान असण्याची शक्यता असून, तपासाचा गुन्हे शाखा अधिक खोलवर शोध घेत आहे.
याआधीही याच पलावा वसाहतीत विदेशी वन्यजीवांची तस्करी उघडकीस आली होती. बंदिस्त सदनिकेतील दुर्गंधीमुळे रहिवाशांनी पोलिसांना कळवले होते आणि त्यातून प्रकार समोर आला होता.
कल्याण-डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरात सुरू आहे. याच मोहिमेंतर्गत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, निरीक्षक राम चोपडे, सहायक निरीक्षक संपत फडोळ, कलगौंडा पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…