•बंटर भवन परिसरात पोलिसांनी लावला सापळा; कारमधून 32 किलो गांजा जप्त, आरोपी प्रताप शर्मा पोलिसांच्या ताब्यात
मुंबई | कल्याण परिसरातून मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला चुनाभट्टी पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. कुर्ला पूर्व परिसरात लावलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीकडून 16 लाख रुपये किमतीचा 32 किलो गांजा जप्त केला आहे.
गुप्त माहितीवरून रचला सापळा
कल्याणहून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन कुर्ला परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती चुनाभट्टी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी कुर्ला पूर्व येथील बंटर भवन परिसरात कडक नाकाबंदी आणि सापळा रचला होता. दरम्यान, कसाईवाड्याच्या दिशेने जाणारी एक संशयास्पद मोटारगाडी पोलिसांच्या नजरेस पडली.
बॅगेच्या झडतीतून फुटले भांडं
पोलिसांनी गाडी थांबवून चालकाकडे विचारपूस केली असता, त्याने सांगितले की कल्याण येथून एका प्रवाशाने ही गाडी आरक्षित (Reserve) केली होती. पोलिसांनी गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाकडे त्याच्याकडील दोन मोठ्या बॅगांबाबत विचारणा केली. मात्र, प्रवाशाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. संशय बळावल्याने पोलिसांनी बॅगांची तपासणी केली असता, त्यात तब्बल 32 किलो गांजा मिळून आला.
आरोपीला अटक आणि मुद्देमाल जप्त
पोलिसांनी तातडीने अंमली पदार्थ जप्त करून प्रवाशाला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याचे नाव प्रताप शर्मा (43 वय) असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जप्त मुद्देमाल: 16 लाख रुपये किमतीचा 32 किलो गांजा.
कारवाई: तस्करीसाठी वापरलेली मोटारगाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…