क्राईम न्यूज

Mumbai Drugs News : मुंबईत ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले! – एएनसीची धडक कारवाई; 4 कोटींहून अधिक किमतीचे ‘हेरॉईन’ आणि ‘एमडी’ जप्त, 10 तस्कर अटकेत

Mumbai Latest Drug News : बोरीवली ते धारावीपर्यंत 6 ठिकाणी छापे; तस्करांकडून 5 लाख 87 हजार रोख रक्कमही हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी कक्षाची विक्रमी कामगिरी

मुंबई :- अंमली पदार्थांचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने बृहन्मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. बोरीवली पूर्व, खार, बांद्रा पश्चिम, धारावी आणि गोरेगाव यांसारख्या प्रमुख ठिकाणांसह एकूण सहा ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी 4 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त केले असून, 10 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. Mumbai Latest Drug News

या कारवाईत एकूण 739 ग्रॅम वजनाचा ‘हेरॉईन’ आणि 452 ग्रॅम वजनाचा ‘एम. डी.’ (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. केवळ अंमली पदार्थच नव्हे, तर तस्करांकडून 5 लाख 87 हजार इतकी मोठी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

एएनसीच्या कांदिवली युनिटने बोरीवली आणि गोरेगाव परिसरातून सर्वाधिक अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये सुमारे 2.53 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन आणि 57.50 लाख किमतीचा एमडीचा समावेश आहे. तर बांद्रा, आझाद मैदान आणि वरळी युनिटनेही बांद्रा, धारावी आणि गोरेगाव पश्चिम परिसरातून लाखो रुपयांचे हेरॉईन आणि एमडी जप्त करून तस्करांना जेरबंद केले आहे.

बृहन्मुंबई पोलिसांनी एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि महत्त्वाच्या ठिकाणी कारवाई करून शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत, हे दाखवून दिले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago