Mumbai Sakinaka Police Busted Drug Racket In Powai : साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई: 44 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; म्हैसूर कनेक्शनही समोर
मुंबई :- मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने साकीनाका पोलीस ठाण्याच्या Sakinaka Police Station हद्दीत एका मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Mumbai Drug Racket पवईतील हिरानंदानी येथील ‘प्रथमेश गॅलेक्सी’ या इमारतीत रंगाच्या गोदामाच्या नावाखाली चालणाऱ्या एका दुकानातून पोलिसांनी तब्बल 43 कोटी 80 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि ते बनवण्यासाठी लागणारे रसायन जप्त केले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. Mumbai Police Latest Crime News
या प्रकरणाची सुरुवात 24 एप्रिल 2025 रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यापासून झाली. अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना अटक करून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील वसई येथील कामण गावातून 8.04 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि ते बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासात पोलिसांनी म्हैसूर, कर्नाटक येथून एका आरोपीला 26 जुलै रोजी अटक केली.
या आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी 30 जुलै रोजी पवई येथील ‘प्रथमेश गॅलेक्सी’ येथील शॉप क्रमांक 9 वर छापा टाकला. या दुकानात रंगाचे गोडाऊन असल्याचा बनाव केला जात होता, मात्र आतमध्ये पोलिसांना 21.903 किलो वजनाचे एमडी ड्रग्ज, तसेच 159 किलो ‘2 Bromo 4 Methyl Propiophenon’ आणि 376 किलो ‘Monomithilamine’ ही एमडी बनवण्यासाठी लागणारी रसायने आढळून आली. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 44 कोटी रुपये आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजितसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप मैराळे यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, अनिल करांडे यांचा समावेश होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…