मुंबई

Mumbai Drugs News : मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई! सव्वासात कोटींच्या गांजासह चार आरोपी ताब्यात

•बँकॉकमार्गे गांजाची तस्करी; गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक

मुंबई :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या तडाखेबंद कारवाईत सुमारे 7.3 किलो ‘हायड्रोपोनिक गांजा’ आणि 99 कोडीनयुक्त खोकल्याच्या औषधाच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या चार स्वतंत्र कारवायांमध्ये चार प्रवाशांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act, 1985) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गांजाची बँकॉक मार्गे भारतात तस्करी!
पहिल्या तीन कारवायांमध्ये बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून हायड्रोपोनिक गांजाचे मोठे प्रमाण हस्तगत करण्यात आले.

पहिल्या प्रवाशाकडून 610 ग्रॅम,

दुसऱ्या प्रवाशाकडून 5256 ग्रॅम,

तर तिसऱ्या प्रवाशाकडून 1452 ग्रॅम गांजा सापडला.

प्रत्येकजण पर्यटनाच्या नावाखाली बँकॉकहून आला होता, मात्र त्यांची बॅगेतून अमली पदार्थ सापडल्यामुळे सर्वांना त्वरित अटक करण्यात आली.

चौथ्या घटनेत, रियाधला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून 99 कोडीन फॉस्फेटयुक्त खोकल्याच्या बाटल्या सापडल्या. हे औषध अतिनशा देणारे असून, गैरवापरासाठी प्रतिबंधित पदार्थांच्या यादीत आहे. या प्रवाशालाही तात्काळ अटक करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांपासून बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी प्रचंड वाढली आहे.दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये गांजाची निर्मिती होते आणि थायलंडमध्ये विक्री कायदेशीर असल्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात भारतात तस्करी केली जात आहे.

केवळ गेल्या सहा महिन्यांत 100 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. थायलंडस्थित भारतीय तस्करांचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago