Mumbai Drugs News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई : १.७३ किलो ‘मेफेड्रॉन’ जप्त, ३ ड्रग्ज तस्कर जेरबंद

मुंबई : बृहन्मुंबई पोलीसांच्या Mumbai Police अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (Anti Narcotics Cell) पुन्हा एकदा मोठा धडक दिला आहे. बोरीवली, मालाड आणि सायन परिसरात सलग केलेल्या तीन कारवायांतून पोलिसांनी १.७३२ किलो मेफेड्रॉन (MD) हा तब्बल ३.५८ कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला असून, तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. Mumbai Police Busted Drug Racket
तीन वेगवेगळ्या कारवाया
बोरीवली (पूर्व, नॅशनल पार्क परिसर) : कांदिवली युनिटने ३ सप्टेंबर रोजी गुप्त माहितीनुसार छापा टाकून ३२ वर्षीय आरोपीला पकडले. त्याच्याकडून १.२९७ किलो MD जप्त करण्यात आला. अंदाजे किंमत ₹२.५९ कोटी.
मालाड (पश्चिम, न्यु म्युनिसिपल मार्केट परिसर) : आझाद मैदान युनिटने १३ सप्टेंबर रोजी कारवाई केली. ३४ वर्षीय आरोपीकडून १८४ ग्रॅम MD जप्त. अंदाजे किंमत ₹३६.८० लाख.
सायन (पश्चिम, राणी लक्ष्मी चौक, BST बस स्टॉपजवळ) : वरळी युनिटच्या कारवाईत २८ वर्षीय आरोपी पकडला गेला. त्याच्याकडून २५१ ग्रॅम MD जप्त. अंदाजे किंमत ₹६२.७५ लाख.
एकूण मुद्देमाल
या तीनही कारवायांतून पोलिसांनी एकूण १.७३२ किलो MD जप्त केला असून त्याची अंदाजे बाजार किंमत ₹३.५८ कोटीपेक्षा जास्त इतकी आहे. Mumbai Latest Drug Racket News

ही संयुक्त मोहिम पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, व पोलीस उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिडेकर यांच्या देखरेखीखाली कांदिवली युनिटचे पो.नि. शशिकांत जगदाळे, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पो.नि. राजेंद्र दहिफळे, तसेच वरळी युनिटचे प्रभारी पो.नि. संतोष साळुंखे व त्यांच्या पथकांनी ही कामगिरी केली.
मुंबई पोलिसांच्या या धडक कारवायांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की अंमली पदार्थ मुक्त समाजासाठी पोलीस दल सातत्याने आणि कटाक्षाने लढा देत आहे.


