क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Drugs News : मुंबईत गस्तीतून गगनाला भिडलेला गांजाचा गटका! 4 कोटींचा ‘हायड्रो’ जाळ्यात, गुन्हे शाखेची सर्जिकल स्ट्राईक

मुंबई | मुंबई गुन्हे शाखेच्या Mumbai Crime Branch पथकाने अंधेरी पूर्वमधून तब्बल 4 कोटी 5 लाख 70 हजार रुपयांचा ‘हायड्रो गांजा’ जप्त करत नशेच्या काळ्याबाजाराला जबरदस्त धक्का दिला आहे. ही कारवाई 4 जुलैच्या रात्री करण्यात आली असून, 3 संशयितांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. Mumbai Crime Branch Busted Drug Racket

गु.प्र.शा. कक्ष-9 चे पोलीस पथक जे.बी. नगरमधील व्ही.एम. शहा रोडवर गस्त घालत असताना, तिघेजण संशयास्पद हालचाली करत असल्याचे लक्षात आले. झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 4 किलो 57 ग्रॅम ‘हायड्रो गांजा’ सापडला. हा अंमली पदार्थ उच्च प्रतीचा असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत चार कोटींच्या घरात असल्याचे उघड झाले आहे.या अंमली तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींवर एनडीपीएस कायद्यानुसार कलम 8(क), 20(ब), 29अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त राज तिलक रौशन, विशाल ठाकूर आणि सहाय्यक आयुक्त प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, महेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुजित म्हैसधुणे यांचा मोलाचा सहभाग राहिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0