•बांद्रा युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 307 ग्रॅम ‘मेफेड्रॉन’सह आरोपी जेरबंद
मुंबई | नागपाडा परिसरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक करत बांद्रा युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. 10 जुलै 2025 रोजी, एम.एस. अली रोड, नागपाडा येथे 307 ग्रॅम वजनाचा ‘मेफेड्रॉन (एम.डी.)’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य सुमारे 76.75 लाख इतकी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून 31 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अटक आरोपी नागपाडा परिसरात अवैधपणे मेफेड्रॉन विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त (अं.प.वि. कक्ष) नवनाथ ढवळे,सहाय्यक पोलीस आयुक्त (अं.प.वि. कक्ष) सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.बांद्रा युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…