Mumbai Crime Branch Busted Drug Racket : मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची दोन ठिकाणी कारवाई; 18 लाखांची रोख रक्कम जप्त
मुंबई | मुंबईच्या अंधेरी परिसरात अंमली पदार्थ विक्रीवर मोठा आघात करत गुन्हे शाखेच्या Mumbai Crime Beanch अंमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 2 कोटी 36 लाख रुपये किमतीचे हेरॉईन, मेफेड्रॉन (एम.डी.), चरस आणि रोख रक्कम जप्त केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहिली कारवाई 7 जुलै 2025 रोजी करण्यात आली. आझाद मैदान युनिटच्या पथकाने लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम) येथून एका इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 703 ग्रॅम चरस, 104 ग्रॅम एम.डी. आणि 18 लाखांची रोख रक्कम असा एकूण 1.14 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या दिवशी, 8 जुलै 2025 रोजी, कांदिवली युनिटने वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) येथे गस्तीदरम्यान हेरॉईन विक्री करणाऱ्या एका इसमाला पकडले. त्याच्याकडून 306 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे 1.22 कोटी रुपये आहे.
प्राथमिक तपासात दोन्ही आरोपी अंधेरी परिसरात ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवायांमुळे अंधेरीतील अमली पदार्थ विक्रीच्या जाळ्याला मोठा धक्का बसला आहे.
पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उप आयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे (कांदिवली युनिट) आणि प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे (आझाद मैदान युनिट) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…