क्राईम न्यूज

Mumbai Drug Racket Busted : “एमडीचा खेळ खल्लास!” – दोन दिवसांत ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश

Mumbai Drug Racket Busted News : 5 तस्कर जेरबंद, 21 नशेखोरांना कोर्टात खेचलं; लाखोंचा ‘मादक माल’ जप्त

मुंबई | मुंबईतल्या पश्चिम उपनगरात ‘एमडी’चा अंधार पसरवणाऱ्या टोळ्यांना परिमंडळ 11 च्या पोलिसांनी जोरदार धक्का दिला आहे. दोन दिवसांत एक महिला तस्करसह पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून तब्बल 4.5 लाखांचा मॅफेड्रॉन (एमडी) आणि गांजा जप्त करण्यात आला आहे. Mumbai Drug Racket Busted News

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली 30 मे ते 1 जून दरम्यान राबवलेल्या मोहिमेत एमएचबी, मालवणी, गोरेगाव, चारकोप अशा विविध भागांत छापे घालण्यात आले. यामध्ये केवळ तस्कर नव्हे, तर अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 21 नशेखोरांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Mumbai Police Latest News

विशेष म्हणजे, पुढील टप्प्यात पोलिसांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुप्त पोलीस पथकं तैनात केली आहेत, जेणेकरून तरुणाई ड्रग्जच्या दलदलीत अडकण्याआधीच त्यांना वाचवता येईल.

ही मोहीम म्हणजे केवळ धाडस नव्हे, तर समाजाला दिशा देण्याचं कार्य आहे. पोलिसांनी दिलेला इशारा स्पष्ट आहे — “नशेच्या सौदागरांना आता शहरात जागा नाही!”

परिमंडळ 11 चे पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव (गोरेगाव), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर (मालवणी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार (एमएचबी) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण (चारकोप) यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी ही कारवाई केली केली.

vivek

Recent Posts