Mumbai Drug Racket Busted : अबब! मुंबईत 4 कोटींचे ड्रग्ज जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची विशेष मोहीम
Mumbai Crime Branch Busted Drug Dealers Racket : डिसेंबर महिन्याच्या 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करत पोलिसांनी 11 ड्रग्ज तस्करांना जेरबंद करून, कोट्यावधीचा अमली पदार्थ मुंबईच्या विविध भागातून जप्त केला आहे
मुंबई :- देशभरात आता थर्टी फर्स्ट ची वेळ आली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर विविध रंगारंगी कार्यक्रम थर्टीफर्स्ट च्या निमित्ताने आयोजित केले जातात. यावर पोलिसांकडून करडी नजर असते परंतु तत्पूर्वी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष मोहीम हाती आहे. Mumbai Anti Narcotics Squad 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीच्या दरम्यान पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना धडा शिकवत त्यांना जेरबंद केले आहे. पोलिसांनी तब्बल चार कोटी एक लाख रुपयांचे अंमली पदार्थ मुंबई पोलिसांच्या अंमली Mumbai Police पदार्थविरोधी पथकाच्या विविध युनिटने जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या विशेष मोहिमा अंतर्गत पोलिसांनी धाडसत्र करत मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालवणी, मालाड, मरोळ अंधेरी परिसरातून चार किलो 669 ग्रॅम चरस, 2395 कोडेन बॉटल्स, 305 ग्रॅम हेरॉईन, 136 ग्रॅम कोकेन तसेच काळाचौकी, सायन, माझगाव, अंधेरी डोंगर, संतोष नगर गोरेगाव, शिवाजीनगर-गोवंडी परिसरात 293 ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), 600 ग्रॅम गांजा एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. ज्याची किंमत चार कोटी एक लाख रुपये असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 11 ड्रग्ज तस्करांना जेरबंद केले आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, Mumbai CP Vivek Phansalkar बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले, आझाद मैदान युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, बांद्रा युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवण खरात, कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव धुमाळ, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी कारवाया केल्या आहे.