क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Drug News : 1 कोटी 46 लाखांच्या अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी सात जणांना जेरबंद ; अंमली पदार्थ विरोधी पथकाची मुंबईच्या वेगवेगळ्या युनिक कडून धडक कारवाई

Mumbai Police Seized Drug Smuggler : अंमली विरोधी पथकाने तब्बल 541 ग्रॅम एम.डी (मेफेड्रॉन) आणि 840 कोडेन बॉटल्स हस्तगत करण्यात आले असून सात जणांना जेरबंद केले आहे

मुंबई :- अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या सात जणांना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वेगवेगळ्या युनिट ने वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे. Mumbai Latest Drug News अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वडाळा पूर्व, वाडी बंदर, मानखुर्द-घाटकोपर लिंक रोड आणि वरळी परिसरातून तब्बल एक कोटी 46 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. यामध्ये 541 ग्रॅम वजनाचे एमडी (मेफेड्रॉन) आणि 840 कोडेन बॉटल्स जप्त करण्यात आली आहे. Mumbai Police Latest Crime News

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे विवीध यूनिट यांनी मागील सात दिवसात विशेष मोहिम राबवून कारवाई केली आहे.बांदा युनिटने 13 एप्रिल रोजी वडाळा पुर्व, परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या दोन इसमांस ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींचे ताब्यातून एकूण 302 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) किंमत अंदाजे रूपये 90 लाख 60 हजार रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्हयाचा पुढील तपास बांद्रा युनिट करत आहे.

वरळी, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून एकूण 86 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) किंमत अंदाजे रूपये 21.50 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा पुढील तपास वरळी युनिट करत आहे.

वाडीबंदर, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून एकूण 75 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) किंमत अंदाजे रूपये 15 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्हयाचा पुढील तपास घाटकोपर युनिट करत आहे.

वडाळा पूर्व, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे एम.डी. (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या एका इसमास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून एकूण 78 ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) किंमत अंदाजे रूपये 15.60 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. अटक आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्हयाचा पुढील तपास कांदिवली युनिट करत आहे.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे बांद्रा युनिटने दिनांक 7 एप्रिल रोजी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, छेडानगर जंक्शन, मुंबई परिसरात गस्तीदरम्यान अवैधपणे कोडेन फॉस्फेट मिश्रीत बॉटल्स् विक्री करणाऱ्या दोन इसमांस ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीचे ताब्यातून एकूण 840 कोडेन फॉस्फेट मिश्रीत बॉटल्स किंमत अंदाजे रूपये 4.20 लाख रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. नमूद अटक आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नमूद गुन्हयाचा पुढील तपास बांद्रा युनिट करत आहे.

हि कारवाई विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अमोध गांवकर, (अति. कार्यभार) अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, व सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि. कक्ष, गुन्हे शाखा, कांदिवली युनिटचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, बांद्रा युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, घाटकोपर युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल ढोले, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
07:52