Mumbai KandivaLi Police Unit Busted Drug Racket : कांदिवली अंमली पदार्थ विरोधी कक्षाची धडक कारवाई; आरोपी सुरजकुमार प्रजापतीवर गांजा तस्करीचे 7 गुन्हे दाखल; जामिनावर सुटूनही गुन्हे सुरूच ठेवल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मुंबई :- बृहन्मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) मोठी आणि कठोर कारवाई केली आहे. अंमली औषधीद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ विधिनिषीदध व्यापार प्रतिबंध अधिनियम 1988 (PIT-NDPS Act) या कठोर कायद्याखाली एका ड्रग्ज तस्कराला एक वर्षासाठी कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
नेमके प्रकरण काय?
सुरजकुमार रामविलास प्रजापती (वय 29, रा. गोरेगाव, मुंबई) हा गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करण्यात सक्रिय होता. त्याच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांत एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ANC च्या कांदिवली युनिटने दाखल केलेल्या गुन्ह्यात तो जामिनावर मुक्त होता. मात्र, जामिनावर सुटल्यानंतरही त्याने पुन्हा अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक होते.
गृह विभागाने दिले स्थानबद्धतेचे आदेश
सुरजकुमार प्रजापती हा अंमली पदार्थांच्या व्यवसायात सक्रीय राहून सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोका निर्माण करत असल्याने, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्यावतीने त्याच्याविरुद्ध PIT-NDPS कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांस सादर करण्यात आला होता.
गृह विभागाने या प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर, आरोपी सुरजकुमार प्रजापतीला ताब्यात घेण्यात आले आणि स्थानबद्धतेच्या आदेशाची बजावणी करून 6 डिसेंबर रोजी एक वर्षाच्या स्थानबद्धतेसाठी त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.
बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कामगिरी अंमली पदार्थ विरोधी कक्षाने पार पाडली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…