क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Drug News :?मालवणी पोलिसांची मोठी कारवाई! – आंतरराष्ट्रीय बाजारात 72 लाखांचे ‘कोकेन’ जप्त; नायजेरियन तस्कर अटकेत

Mumbai Malwani Police Latest Drug Racket Busted News : 180 ग्रॅम कोकेनसह परदेशी नागरिक जेरबंद; ‘वाणिज्य प्रमाण’पेक्षा जास्त अंमली पदार्थ बाळगल्याने एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल; आरोपीकडे पासपोर्ट, व्हिसा नाही

मुंबई :- मुंबईतील अंमली पदार्थ तस्करांविरुद्धच्या मोहिमेत मालवणी पोलिसांनी Malwani Police मोठी यश मिळवले आहे. पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 72 लाख रुपये किंमत असलेले 180 ग्रॅम ‘कोकेन’ (Cocaine) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. Mumbai Latest Crime News

सापळा रचून अटक

दिनांक 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदाराकडून पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे आणि निगराणी पथकाला माहिती मिळाली की, एक परदेशी व्यक्ती मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ घेऊन येणार आहे. वरिष्ठांना तात्काळ माहिती देऊन सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला.

पोलिसांनी शिताफीने मोनाची अगवू उर्फ ओलीवर जे अगबू (Munachi Agwu @ Oliver j Agwu) (वय २७) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे वाणिज्य प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच 180 ग्रॅम कोकेन मिळून आले, ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति ग्रॅम 40 हजार रुपये गणली जाते.

गंभीर गुन्हा दाखल

आरोपीविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस ॲक्ट 1985 चे कलम 8 (क) सह 21 (क) (कमर्शियल कॉन्टिटी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे पासपोर्ट आणि व्हिसासारखी कोणतीही कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे त्याने हा अंमली पदार्थ कोठून आणला, कोणाला विकणार होता आणि तो भारतात कसा आला, याबाबत पोलीस अधिक कसून चौकशी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0