Mumbai Oshiwara Police Latest News : ओशिवरा पोलिसांची कारवाई; इंडोनेशियातून आलेले दोघे नायजेरियन टोळीशी संबंधीत असल्याची शक्यता
मुंबई | मुंबईत अंमली पदार्थांच्या साखळीवर ओशिवरा पोलिसांनी मोठा घाव घालत आंतरराष्ट्रीय बाजारात 21 कोटींहून अधिक किंमत असलेल्या 21 किलो 552 ग्रॅम हायड्रो गांजाची जप्ती केली आहे. या कारवाईत इंडोनेशियाचे दोन नागरिक अटकेत घेतले असून, त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Oshiwara Police Latest News
27 जून 2025 रोजी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणावली, पोलीस निरीक्षक मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम यांच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की, जोगेश्वरी पश्चिम परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन येणार आहे. माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली.
छाप्यात Budi Wiyono (वय 44) आणि Rakhmat Ardi Hidayat (वय 39) या इंडोनेशियन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 21.552 किलो वजनाचा ‘हायड्रो गांजा’ जप्त करण्यात आला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 21 कोटी 55 लाख 20 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात Mumbai Oshiwara Police Latest News एन.डी.पी.एस. ॲक्ट 1985 च्या कलम 8(क), 20(ब)ii(क) व 29 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक आरोपींकडून अधिक माहिती घेण्यासाठी तपास सुरू असून, हे दोघे आंतरराष्ट्रीय ड्रग नेटवर्कचा भाग आहेत का, याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…