महाराष्ट्र
Trending

Mumbai Drug News : मुंबई मायानगरीत 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून दोघांना अटक

Mumbai Crime Branch Caught 10 Crore Worth Drugs : मुंबई गुन्हे शाखेनं आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने अमली पदार्थांच्या तस्करी आणि विक्री प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करत 2 आरोपींना अटक केली.

मुंबई :- चुनाभट्टी पोलिसांच्या Chunabhatti Police एटीसी पथक आणि परिमंडळ-6 यांच्या विशेष पथकाने हद्दीतील संशयितरित्या हालचाली करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल एक कोटी 90 लाख रुपयांचे उच्च प्रतीचे चरस हा अंमली पदार्थ पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी एकूण कारवाई मध्ये तब्बल दहा कोटी 53 लाख रुपयांचा अफगाणी चरस जप्त केला आहे. Mumbai Crime Branch Caught 10 Crore Worth Drugs

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे एटीएस पथक आणि परिमंडळ-6 विशेष पथके पोलीस ठाण्याचे हद्दीत गस्ती घालत असताना रहीम माजिद शेख (30 वय, रा. डुंगरी लिंक रोड, वलसाड गुजरात) संशयितरित्या वावरत होता. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल एक किलो 907 ग्रॅम वजनाचे चरस ज्याची किंमत एक कोटी 90 लाख रुपये हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी मुंबईत आल्याचे त्यांनी सांगितले होते. याप्रकरणी पोलीस हवालदार नितेश विचारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुन्ह्याचा अधिक तपास गुजरात राज्यातील वलसाड या ठिकाणावरून कधी स्थानिक पोलिसांच्या मदतीने नितीन शांतीलाल टंडेल (32‌‌ वय रा. वलसाड गुजरात) असे आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीकडे तब्बल आठ किलो 146 ग्रॅम वजराचे अफगाणीचा रस ज्याची किंमत अंदाज आहे आठ कोटी दहा लाख 46 हजार रुपये अंमली पदार्थ आरोपीकडून जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून तब्बल 10 किलो 53 ग्रॅम वजनाचे चरस बी जी किंमत 10 कोटी 53 हजार एवढा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून सध्या त्यांना पुढील तपासणीसाठी पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई विवेक फणसळकर,विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई देवेन भारती सह पोलीस आयुक्त का व सु श्री सत्यनारायण चौधरी,अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग डॉ. महेश पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ-6, नवनाथ ढवळे सहायक पोलीस आयुक्त नेहरूनगर विभाग युसुफ सौदागर , यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव, पोलीस निरीक्षक राजु दुबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन ढोबळे, पोलीस हवालदार नितेश विचारे, सतिश शेळकंदे, पोलीस शिपाई अमोल सरडे, अमोल यमगर, राऊत, सानप, माळवे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0