क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mumbai Drug News : अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला छत्रपती संभाजी नगर कारागृहात स्थानबद्ध!

PITNDPS ACT 1988 अंतर्गत मुंबई पोलिसांची पहिली कारवाई

मुंबई :- मुंबई पोलिसांनी PITNDPS ACT 1988 अंतर्गत Mumbai Police पहिल्यांदाच कारवाई करत एका सराईत अंमली पदार्थ तस्करी Drug Smuggling करणाऱ्या गुन्हेगाराला छत्रपती संभाजीनगर कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, Mumbai CP Vivek Phansalkar विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या निर्देशांनुसार पोलीस आयुक्त सत्य नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कायद्याने विशेष मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली आहे. Mumbai Police Latest News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आर.सी.एफ पोलीस ठाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अंमलीपदार्थाची तस्करी करणारा मोहम्मद इकलाख बशीर शेख उर्फ मोहम्मद इकलाख मोहम्मद ईस्माईल शेख उर्फ मुसा उर्फ सलमान उर्फ अकलाख, (वय 32) याच्याविरूध्द मुंबई शहरात अंमली पदार्थ तस्करीचे एकूण 07 गुन्हे दाखल होते. आर.सी.एफ. पोलीस ठाणेकडून आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार 15 ऑक्टोबर रोजी स्थानबध्द अधिकारी तथा प्रथान सचिव (अपील व सुरक्षा, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई) यांनी त्यांच्या विरुद्ध PITNDPS ACT 1988 अन्वये स्थानबध्द करण्याचे आदेश पारित केल्याने नमूद स्थानबध्द इसमास 16 ऑक्टोबर रोजी स्थानबध्द आदेशाची बजावणी करून त्यास 17 ऑक्टोबर रोजी सुरक्षितरित्या मध्यवती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे जमा करण्यात आले आहे. PITNDPS ACT 1988 अन्वये स्थानबध्द करण्याची कारवाई ही मुंबई पोलीस आयुक्तालयातील पहिलीच कारवाई आहे. Mumbai Police Latest News

पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) विनायक देशमुख, अपर पोलीस आयक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) महेश पाटील, तत्कालीन पोलीस उप आयुक्त (परिमंडळ – 6) हेमराजसिंह राजपूत, पोलीस उप आयुक्त (परिमंडल 6) नवनाथ ढवळे, तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त (ट्रॉम्बे विभाग) सुहास हेमाडे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आर.सी. एफ. पोलीस ठाणे) केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आर. सी. एफ. पोलीस ठाणेचे तडीपार अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे. Mumbai Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0