Mumbai Latest Drug News : 10 किलो एमडी आणि कर्नाटकच्या फॅक्टरीवर टाकलेल्या धाडीप्रकरणी कारवाई; 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला
मुंबई | मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (बांद्रा व घाटकोपर युनिट) Mumbai Bandra And Ghatkopar Anti Narcotics Unit 2017 मध्ये उघडकीस आणलेल्या एका आंतरराज्यीय ड्रग्ज रॅकेटप्रकरणी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. Mumbai Drug Connection प्रवीण दिलीप वाघेला आणि रामदास पांडुरंग नायक या दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत 20 वर्षे कारावास आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. Mumbai Latest Crime News
चेंबूरच्या सापळ्यातून फुटले रॅकेटचे धागेदोरे 9 जानेवारी 2017 रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चेंबूरच्या छेडा नगर बस स्टॉपवर सापळा रचण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी प्रवीण वाघेला याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये त्याच्या कब्जातून 10 किलो 200 ग्रॅम एमडी (Mephedrone) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 2 कोटी 4 लाख रुपये होती. Mumbai Latest Drug News
कर्नाटकातील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश प्रवीण वाघेलाच्या अटकेनंतर करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. त्याने कर्नाटक राज्यातील हवेरी जिल्ह्यातील कामनहल्ली येथे एका केमिकल प्लॉटमध्ये रामदास नायक याच्या मदतीने एमडी ड्रग्ज तयार करत असल्याची कबुली दिली. मुंबई पोलिसांनी तातडीने कर्नाटकात जाऊन छापा टाकला. तिथे 7 किलो एमडी (किंमत 1 कोटी 40 लाख रुपये) आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे शेकडो किलो रसायने (Liquid Bromine, Hydrobromic Acid, Mono methyl amine) जप्त करण्यात आली.
न्यायालयीन लढा आणि ठोस पुरावे या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे यांनी केला. पोलिसांनी विहित वेळेत न्यायालयात भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र सादर केले. 44 व्या विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी अभियोक्ता भगवान राजपूत यांनी मांडलेले युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले साक्षीदार ग्राह्य धरून, न्यायालयाने 17 डिसेंबर 2025 रोजी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले.
जप्त केलेला मुद्देमाल
एमडी ड्रग्ज: एकूण 17 किलो 200 ग्रॅम (किंमत सुमारे 3.5 कोटी रुपये).
वाहने: होंडा सिविक मोटर कार (7 लाख रुपये).
केमिकल्स: सुमारे 14000 लिटर आणि 400 किलो विविध रसायने.
मुंबई पोलिसांची ‘ड्रग्ज मुक्त समाज’ मोहीम पोलीस आयुक्त देवेन भारती आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. “बृहन्मुंबई पोलीस अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील असून, अशा कठोर शिक्षेमुळे ड्रग्ज माफियांना मोठा इशारा मिळेल,” अशी भावना पोलीस दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…