Mumbai Latest Drugs News : रे रोड परिसरात कोकेनयुक्त औषधांच्या बाटल्यांसह गुन्हे शाखेने केली होती अटक; पोलिसांच्या पुराव्यांवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब
मुंबई | मुंबईतील रे रोड परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला मुंबईच्या विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि 1 लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. ‘बबलू पुनवासी गुप्ता’ असे या आरोपीचे नाव असून, अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) त्याच्याकडून कोकेनयुक्त कफ सिरपचा मोठा साठा जप्त केला होता. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागणार आहे. Mumbai Latest Crime News
नेमकी घटना काय?
31 डिसेंबर 2021 च्या रात्री, मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे (आझाद मैदान युनिट) पथक रे रोड परिसरातील संत सावता मार्ग येथे गस्त घालत होते. यावेळी बीएमसी उदंचन केंद्राजवळ बबलू गुप्ता हा संशयास्पदरित्या एका मोठ्या पिशवीसह उभा होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांनी त्याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्या पिशवीत ‘Chlorpheniramine Maleate & Codeine Phosphate’ सिरपच्या एकूण 136 बाटल्या (Morcerex) सापडल्या. 40 हजार 800 रुपये किमतीचा हा साठा अंमली पदार्थ म्हणून प्रतिबंधित असल्याने पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
न्यायालयीन लढा आणि शिक्षा
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील आणि मानसिंग काळे यांनी केला.तपासाअंती विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी अभियोक्ता शंकर एरंडे यांनी मांडलेले युक्तिवाद, सादर केलेले तांत्रिक पुरावे आणि पोलिसांच्या साक्षी ग्राह्य धरून 43 व्या विशेष सत्र न्यायालयाने 23 डिसेंबर 2025 रोजी हा ऐतिहासिक निकाल दिला.
पोलीस दलाची यशस्वी कामगिरी
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम आणि उपआयुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मुंबईला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, अशा प्रकारच्या कठोर शिक्षेमुळे तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास पोलीस दलाने व्यक्त केला आहे.
या यशस्वी तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, कोर्ट पैरवी अधिकारी मोहना आव्हाड आणि अमोल पाटील यांचा समावेश होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…