Mumbai Police Busted International Drug Racket :,वाशीतील एका अटकेतून उलगडले आंतरराज्य जाळे; 7 पथकांच्या कारवाईत 4 आरोपी जेरबंद
मुंबई | अंमली पदार्थांच्या विरोधात महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सने Anti Narcotics Task Force आता राज्याच्या सीमा ओलांडून मोठी कामगिरी केली आहे. बंगळुरू शहरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या मेफेड्रॉन (MD) निर्मितीच्या तीन कारखान्यांवर छापे टाकून पोलिसांनी 55 कोटी 88 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एमडी तयार करण्याची यंत्रसामग्री, रसायने आणि मोठ्या प्रमाणात तयार ड्रग जप्त करून कारखाने पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत. Mumbai Latest Drug News
वाशी ते बंगळुरू: असा लागला छडा या मोठ्या कारवाईची सुरुवात 21 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी परिसरातून झाली. कोकण पथकाने वाशी गावातून अब्दुल कादर रशीद शेख याला 1 कोटी 48 लाखांच्या एमडीसह अटक केली होती. त्याच्या सखोल चौकशीतून आणि तांत्रिक विश्लेषणातून बेळगावचा ड्रग निर्माता प्रशांत यल्लापा पाटील याचे नाव समोर आले. पाटीलच्या मागावर असलेल्या पोलिसांनी मग बंगळुरूच्या दिशेने कूच केली.
लोकवस्तीत सुरू होता मृत्यूचा व्यापार पोलिस पथकाने बंगळुरूमध्ये सुरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. बंगळुरूतील स्पंदना लेआउट, एनजी गोलाहळी भागातील ‘आर जे इव्हेंट’ नावाची फॅक्टरी आणि येरपनाहळी कन्नूर येथील एका निवासी घरात हे कारखाने सुरू होते. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता.
4 किलो 100 ग्रॅम घन स्वरूपातील एमडी.
17 किलो द्रव स्वरूपातील एमडी.
असा एकूण 21 किलो 400 ग्रॅम साठा आणि रसायने जप्त केली.
मालमत्तेवर टाच येणार तपासात निष्पन्न झाले आहे की, या कारखान्यांतून तयार होणारे ड्रग्ज केवळ महाराष्ट्र किंवा कर्नाटकातच नाही, तर संपूर्ण भारतात वितरित केले जात होते. या काळ्या धंद्यातून आरोपींनी बंगळुरू शहरात मोठी स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे, ज्याचा तपास आता पोलीस करत आहेत. या गुन्ह्यात आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…