Mumbai Drug Crime News : मुंबई शहरात उच्चभु परिसरात एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करुन एकूण 4 अंमली पदार्थ तस्कर यांना जेरबंद करुन 6 करोड पेक्षा जास्त किमतीचा 3 किलो एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त.
*3 किलो ग्रॅम वजनाचा एम. डी. (मेफेड्रॉन), 7 मोबाईल असे एकुण 6 कोटींपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ व मोबईल*
मुंबई :- 3 किलो ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे बांद्रा युनिटचे पथकाने 27 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी जे जे मार्ग परिसरात, मुंबई अंमली पदार्थ विरोधी गस्त करताना दोन संशयीत इसम एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थासह मिळून आले त्यांचेकडे मिळून आलेल्या एम.डी. (मेफेड्रॉन) बाबत तपास करता त्यांनी त्यावेकडील अंमली पदार्थ धोबीघाट, महालक्ष्मी, मुंबई परीसरातुन घेतला असल्याचे सांगितल्यावरुन धोबीघाट, महालक्ष्मी, मुंबई परीसरात तपास करता आणखी दोन इसम एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्यासह मिळुन आले. वर नमुद चारही इसम यांचे ताब्यातून एकूण 3 किलो ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) व 7 मोबाईल असे एकुन किं.अं. 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्षाने बांद्रा युनिटने कलम 8 (क) सह 22 (क), 29एन.डी.पी. एस. ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन चारही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मुंबई यांनी शहरामध्ये विविध ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करत छापे टाकत एकूण 04 अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना अटक करून त्यांचेविरूध्द गुन्हा दाखल केला असून, त्यांचे ताब्यातून एकूण 3 किलो ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रॉन) व सात मोबाईलसह किंमत रुपये 6 कोटीपेक्षा अधिक किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आले आहे.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाने सन 2023 मध्ये एकूण 106 गुन्हे दाखल करत त्यामध्ये एकूण 229 अंमली पदार्थ तस्करांना अटक केली असून, त्यांचे ताब्यातून एकूण 53.23 कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ नप्त करण्यात यश आले आहे. त्याच प्रकारे सन 2024 मध्ये एकुण 20 गुन्हे दाखल करून त्यामध्ये एकूण 47 अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुध्द कारवाई केली असून, त्यांचे ताब्यातून अंदाजे 29 कोटी 86 लाख 57 हजार रूपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आले आहे.
पोलीस पथक
विवेक फणसळकर CP Vivek Phansalkar, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती Deven Bharti, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम Lakhmi Gautam, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शशि कुमार मीना Shashikumar Meena, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), शाम घुगे, पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई, राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत बांद्रा युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक फाळके, पोलीस हवालदार देसाई, तळपे, पोलीस हवालदार मांढरे, म्हाडेश्वर, महिला पोलीस शिपाई आव्हाड, पोलीस शिपाई सौदाणे, मोहिते, राठोड,काळे,निमगिरे, भोर यांनी केली आहे.