महाराष्ट्रठाणेमुंबई

Ganpati News : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

Eknath Shinde On Ganpati Ustav : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, ‘कोकण दर्शन’ पास मिळणार

मुंबई :- गणेशोत्सवासाठी कोकणात Ganpati Ustav जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी गणेशभक्तांना टोलमधून मोठा दिलासा दिला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळूरू, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांसह इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसना टोल माफ करण्यात येणार आहे.

यासाठी विशेषतः “गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन” नावाचा पास दिला जाणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल. हा पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), पोलीस आणि वाहतूक विभागाकडे उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, परतीच्या प्रवासासाठीही हाच पास ग्राह्य धरला जाईल.

उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, ग्रामीण आणि शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने या पासच्या वाटपाचे योग्य समन्वय साधावा जेणेकरून प्रवाशांना वेळेत ही सुविधा मिळेल. तसेच, यासंदर्भात जाहिराती आणि सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0