Mumbai Latest Digital Arrest Fraud News : वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि NIA चे ओळखपत्र दाखवून ज्येष्ठ नागरिकाला घातले जाळ्यात; बँक खात्यांमध्ये अनेक राज्यांत तक्रारी
मुंबई :- वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात सहभाग असल्याचा बनाव रचून ज्येष्ठ नागरिकांना अटकेची भीती दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील दोन सक्रिय हस्तकांना सायबर पोलीस ठाणे, Mumbai Cyber Poluce Station उत्तर विभागाने गजाआड केले आहे. या कारवाईमुळे ‘डिजिटल अरेस्ट’ नावाच्या सायबर गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. Mumbai Latest Digital Arrest Fraud News
काय आहे ‘डिजिटल अरेस्ट’ गुन्हा?
दिनांक 11 सप्टेंबर 2025 ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत एका नामांकित बँकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अज्ञात मोबाईल क्रमांकधारकाने व्हॉट्सॲप कॉल आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख नाशिक पोलीस अधिकारी अशी देऊन फिर्यादीचा मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यात सहभाग असल्याची बतावणी केली. Mumbai Latest Cyber Fraud News
आरोपींनी फिर्यादीला शासनाचे शिक्के, सही असलेले तसेच फिर्यादीचे नाव आणि आधार कार्ड नंबर असलेली बनावट पत्रे, एफआयआर कॉपी आणि National Investigation Agency (NIA) मधील आयपीएस अधिकाऱ्याचे ओळखपत्र व्हॉट्सॲपद्वारे पाठवले.
फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला तात्काळ अटकेची भीती दाखवत त्यांना ‘सर्व्हेलन्स’ (Surveillance) खाली ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. सलग तीन दिवस व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलसमोर बसण्यास भाग पाडून, गुन्ह्याच्या चौकशीच्या बहाण्याने त्यांचे बँक तपशील आणि एफडीमधील रक्कम जाणून घेतली.
या माहितीच्या आधारे, आरोपींनी बँक खाते तपासणीच्या बहाण्याने फिर्यादींना अनोळखी बँक खात्यात एकूण 50 लाख 50 हजार 900 रुपये (पन्नास लाख पन्नास हजार नऊशे रुपये) वळते करण्यास भाग पाडले आणि आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी 9 ऑक्टोबर 2025 रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सायबर पोलिसांचा यशस्वी तपास
गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादीने रक्कम जमा केलेल्या ‘फर्स्ट लेयर बेनिफिशरी’ (First Layer Beneficiary) बँक खातेदाराचा शोध घेतला. हा खातेदार ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तपास करून 25 ऑक्टोबर 2025 रोजी एका आरोपीला अटक केली.
या आरोपीने पैशाच्या मोबदल्यात स्वतःचे वैयक्तिक तपशील वापरून बँक खाते तयार करून ते साथीदारांना सायबर गुन्ह्यातील रक्कम स्वीकारण्यासाठी दिले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक तपास करून पोलिसांनी आणखी एका साथीदाराला अटक केली आहे.
अटक आरोपींची माहिती
1.रवी आनंदा आंबोरे (वय 35 )
2.विश्वपाल चंद्रकांत जाधव (वय 37)
या आरोपींकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बँक खात्यांविरोधात देशभरात सात तक्रारी नोंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली गेली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…