
Mumbai Andheri Dance Bar Busted News : मुंबईच्या अंधेरी परिसरात दीपा बार येथे आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारची खुलेआम छमछम सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय
मुंबई जितिन शेट्टी : गाण्यांवर अश्लील नृत्याचा ठेका घेणाऱ्या बारबालांच्या नादात पैशांचा अविश्रांत वर्षाव करताना अनेक आंबट शौकीन कॅमेऱ्यात कैद झाले. Mumbai Dance Bar Busted त्यांचा व्हीडीओही व्हायरल झाला. परंतु सारे काही आपलेच अशी भूमिका घेत या गंभीर मुदयावर पोलिसांनी मौन बाळगणेच पसंत केले. ही खळबळजनक घटना मुंबई पोलिस Mumbai Police आयुक्तालयाच्या हददीत असलेल्या अंधेरी पुर्व येथील दीपा बार Mumbai Dance Bar Deepa Busted News मध्ये झालेल्या स्टींग ऑपरेशन मध्ये समोर आली आहे. Sting Operation At Deepa Bar Andheri बारबालांवर पैशांचा वर्षाव करणे नियमबाहय आहे. यामुळे कायद्याचे सर्रास उल्लंघन होते. याबाबत पोलिसांनी आता ॲक्शन मोडवर येणे गरजेचे आहे. इतरत्र नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. Mumbai Police On Deepa Bar त्यामुळे पोलिसांनी नियम डावलणाऱ्या दीपा बारवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
अंधेरीच्या दीपा बारमध्ये आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबारची खुलेआम छमछम सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. या डान्सबारमध्ये बारबालांवर पैशाचा पाऊस पडत असल्याचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.