मुंबई
Trending

Mumbai Dahi Handi Ustav : थरांवरून कोसळले 30 गोविंदा, मुंबईत दहीहंडीचा थरार अपघातांनी झाला कटू!

Mumbai Dahi Handi Ustav Latest News : उत्सवाच्या उत्साहात 30 गोविंदा जखमी; 15 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई :- दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, मुंबईत थरावरून पडून 30 हून अधिक गोविंदा जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. Mumbai Dahi Handi Ustav 2025 या अपघातांनी उत्सवाच्या आनंदाला गालबोट लागले आहे. जखमी झालेल्यांपैकी 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 15 जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये हे अपघात घडले आहेत. सर्वाधिक 18 गोविंदा मुंबई शहरात जखमी झाले, त्यातील 12 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. पूर्व उपनगरात 6 गोविंदा जखमी झाले, ज्यापैकी 3 जणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. पश्चिम उपनगरातही 6 जण जखमी झाले, त्यापैकी 5 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

दहीहंडीदरम्यान सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हे अपघात घडले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी मानवी मनोरे रचताना पुरेसे सुरक्षा उपाय (उदा. हेल्मेट, सुरक्षा जाळी) वापरले नसल्याने जखमींची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. अजूनही अनेक ठिकाणी उत्सव सुरू असल्याने जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0