Mumbai Dadar Kabutar khana : दादरच्या कबुतरखान्यावर जैन समाज आक्रमक; ताडपत्री हटवून न्यायालयाच्या आदेशाला विरोध

Jain Samaj On Mumbai Dadar Kabutar khana : आरोग्याच्या कारणांमुळे कबुतरखाने बंद करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश, तरीही जैन समाजाचा विरोध कायम
मुंबई :- दादर येथील प्रसिद्ध कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यावरून आज मोठा वाद निर्माण झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने कबुतरांना अन्न घालण्यावर बंदी घातली होती आणि कबुतरखाना बंद केला होता. Jain Samaj On Mumbai Dadar Kabutar khana मात्र, आज जैन समाजाच्या अनेक सदस्यांनी आक्रमक होत कबुतरखान्यावरील ताडपत्री आणि बांबू काढून टाकले.
कबुतरखान्यामुळे पसरणाऱ्या विविध आजारांमुळे (उदा. श्वसनाचे विकार) उच्च न्यायालयाने हा कबुतरखाना बंद करण्याचे आदेश दिले होते. यावर कारवाई करत महापालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री लावली होती. मात्र, आज प्रार्थना सभेसाठी जमलेल्या जैन समाजाच्या जमावाने ही ताडपत्री फाडून टाकली.
यापूर्वी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘दादरमधील कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ’ असे आश्वासन दिले होते. तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ‘कंट्रोल फिडिंग’ करण्याची सूचनाही त्यांनी महापालिकेला दिली होती. यानंतरही जैन समाजाने आज आक्रमक भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिक अनेक महिन्यांपासून कबुतरखाना हटवण्याची मागणी करत आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे, कबुतरांना अन्न देणे हा धार्मिक विधी असल्याचा जैन समाजाचा दावा आहे. या वादामुळे दादरच्या कबुतरखान्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे


